भाषांतर: प्रताप माने
शारजा शहाबुद्दीन ह्या पॅरिसमधील EHESS (École des Hautes Études En Sciences Sociales - “इकोल दे ओत एत्युद ओं सियोंस सोसिआल) मधून डॉक्टरेट आहेत. त्या पॅरिसमधील SciencePo (सियोंसपो) आणि INALCO (Institut National des Langues Orientales - इंस्टीट्यू नास्योंनाल दे लोंग ओरिओंताल) मध्ये शिकवतात. त्यांचे संशोधन बांगलादेशातील इस्लामिक नियमांच्या निर्मितीवर केंद्रित आहे. शारजा अनेक भाषांमध्ये पारंगत आहे आणि त्यांना कलां-साहित्य यांत खूप रस आहे. शारजाने भारतीय शास्त्रीय संगीत शिकले आहे आणि त्या भारतीय शास्त्रीय नृत्य प्रकार भरतनाट्यम शिकवतात. त्यांचा “शारजा” नावाचा स्वतःचा कपड्यांचा ब्रँड आहे.
स्थलांतरित बांगलादेशी पालकांच्या पोटी जन्मलेल्या शारजाने १९९० च्या दशकातील पॅरिस मधल्या आपल्या बालपणाचे रोचक विवरण केले आहे. त्यांची जिद्द आणि त्यांचे चैतन्य अनेकांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे! शारजाच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक प्रवासाच्या शोधयात्रेची गाथा वाचकांसाठी सादर!
टिपा:
१) कृपया ही मूळ मुलाखत खालील लिंकवर पहा.
२) मुलाखतीला एकाच वेळी फ्रेंच आणि हिंदी उपशीर्षकेआहेत.
अनुबंध: नमस्कार! मी अनुबंध काटे आहे. मी पॅरिसमध्ये राहणारा एक इंजिनियर आहे. आज माझ्यासोबत एक खूप खास आणि उत्साही व्यक्तिमत्व आहे. त्यांचे नाव आहे शारजा शहाबुद्दीन! नमस्कार शारजा, तुमचं स्वागत आहे!
शारजा: नमस्कार, मला इथे बोलावल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
अनुबंध: हे माझे सौभाग्य आहे! साधारणतः मी माझ्या चॅनलवर अशा लोकांना बोलावतो ज्यांनी एखादं पुस्तक लिहिलं आहे. तुमच्या बाबतीत अजून तसं नाही. पण, आपण नुकतेच पॅरिसमध्ये भेटलो आणि तुम्ही करत असलेलं काम, तुमची पार्श्वभूमी आणि तुमचे शिक्षण बघून मी खूप प्रभावित झालो.
माझ्या प्रेक्षकांसाठी थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्ही एक राज्यशास्त्रज्ञ (political scientist) आहात, सेंटर फॉर साउथ एशियन अँड हिमालयन स्टडीज (Center for South Asian and Himalayan Studies -CESAH) मध्ये तुम्ही संशोधन काम करता. तुम्ही भरतनाट्यम शिकला आहात आणि ते तुम्ही शिकवता सुद्धा. शिवाय, तुम्ही हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत सुद्धा शिकला आहात. तुमच्या कपड्यांच्या ब्रँडचं नाव "शारजा" आहे. तुम्ही केनिया, बांगलादेश, फ्रान्स आणि इतर अनेक देशांमध्ये काम केलं आहे. तर आपण तुमच्या नावापासून सुरुवात करूया. तुम्ही मला आधी सांगितल्याप्रमाणे, आपण त्याचा उच्चार दोन प्रकारे करू शकतो, बरोबर? फ्रेंचमध्ये ते " शारजा" आणि बंगालीमध्ये "शोरजा" होतं. हे बरोबर आहे का?.
शारजा: हो, ते बंगालीतील "चर्यपद" मधून आलेलं "शोरजा" आहे, जे मुळात संस्कृतमधून आलं आहे. आणि फ्रेंचमध्ये त्याचं
"शारजा" होतं, जे आपल्याला दाखवतं की एकाच नावाने व्यक्तीची वेगवेगळी ओळख कशी असू शकते. लोकांचे
स्थलांतर (Immigration/emmigration) आणि त्यानुसार नावं कशी बदलतात याची थोडी
कल्पना येते. हे खरं आहे की "शोरजा"चं फ्रेंचमध्ये "शारजा" असं लिप्यंतरण झालं, जरी बांगलादेशात बऱ्याच लोकांना "चर्यपद" म्हणजे काय ते माहीत नाही. ज्यांना माहीत आहे, ते आधीच अभ्यासक किंवा साहित्य क्षेत्रातले लोक आहेत. "चर्यपद" हे बाराव्या शतकात नेपाळी भाषेत सापडलेल्या एका ग्रंथाचं नाव आहे. मुळात, ही संस्कृतच्या आधीची वर्णमाला होती. या कवितांचे पहिले श्लोक हेच "चर्यपद" होते.
अनुबंध: धन्यवाद. मला वाटतं की माझ्या प्रेक्षकांना आता याचा अंदाज आला असेल की तुम्ही इतिहास सुद्धा शिकवता!आपण कदाचित दुसऱ्या सत्रात यावर अधिक बोलू शकतो जिथे तुम्ही आम्हाला बांगलादेशच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीबद्दल, धर्मनिरपेक्षता(secularism), इस्लामवाद(Islamism) आणि इतर गोष्टींबद्दल सांगू शकाल. पण, आजचा दिवस तुम्हाला, तुमच्या कामाला आणि तुमच्या आतापर्यंतच्या प्रवासाला समर्पित आहे. चला सुरुवात करूया!तुम्ही पॅरिसमध्ये राहता. तुमचा जन्म इथेच झाला आहे आणि तुमचे आई-वडील बांगलादेशातून आले आहेत. कृपया आम्हाला तुमच्या कुटुंबाच्या पार्श्वभूमीबद्दल, तुमच्या बालपणाबद्दल आणि तुम्ही कुठून आलात याबद्दल सांगाल का?.
शारजा: हो, नक्कीच. या प्रश्नासाठी धन्यवाद. माझे आई-वडील दोघेही बांगलादेशातून आले आहेत. पण, माझा जन्म १९९१ मध्ये पॅरिसमध्ये झाला. माझे वडील चित्रकार आहेत. ते कलाकार आहेत आणि बांगलादेशचे स्वातंत्र्यसैनिक पण आहेत. त्यांनी १९७१ च्या युद्धात "मुक्ती जोद्धा" (स्वातंत्र्यसैनिक) म्हणून भाग घेतला होता. पण, ते पॅरिसमध्ये "ललित
कला" (Fine
Arts) शिकायला आले होते. ते १९७४ च्या सुमारास इथे आले. नंतर जेव्हा ते बांगलादेशला गेले होते, तेव्हा त्यांनी माझ्या आईशी लग्न केलं. माझी आई लेखिका आणि पत्रकार आहे. ते परत आले आणि पॅरिसमध्ये स्थायिक झाले. येथील बौद्धिक आणि कलात्मक वातावरणात ते खूप आनंदी होते. अनेक राजकीय कारणं सुद्धा होती, कदाचित त्या काळात बांगलादेशात झालेल्या बदलांमुळे. माझी बहीण(जी माझ्यापेक्षा साडेतीन वर्षांनी मोठी आहे)आणि मी, आम्ही दोघीही पॅरिसमध्ये वाढलो.आमच्या घरात आई-वडील नेहमी आमच्याशी बंगालीत बोलायचे. त्यामुळे, बंगाली भाषा आणि बांगलादेशी-बंगाली ओळख आमच्या आयुष्यात आणि शिक्षणात खूप महत्त्वाची होती.
अनुबंध: तुम्ही हे सुद्धा मला सांगितलं
होते की तुमचे वडील स्वातंत्र्यसैनिक होते, बरोबर? ते बांगलादेशच्या अवामी लीग(Awami League) पक्षासाठी काम करत होते का?
शारजा: नाही, त्यांनी कधीही पक्षासाठी काम केलं नाही. ते अजिबात राजकारणी नाहीत, पण त्यांची भूमिका एकप्रकारे राजकीय झाली. फक्त आठवण करून देण्यासाठी, १९४७ मध्ये भारताची फाळणी झाल्यानंतर १९४७ ते १९७१ पर्यंत पाकिस्तानचे दोन भाग होते - पूर्व पाकिस्तान (जो आताचा बांगलादेश आहे) आणि पश्चिम पाकिस्तान (जो आताचा पाकिस्तान आहे). पाकिस्तानच्या या दोन भागांमध्ये २००० किलोमीटरचं अंतर असण्याची ही एक विचित्र कल्पना होती. आणि पूर्व पाकिस्तानी लोकांवर पाकिस्तानच्या केंद्रीय प्रशासनाकडून खूप वाईट वागणूक मिळत होती. त्यामुळेच पाकिस्तानी सैन्याने जमात-ए-इस्लाम या इस्लामी पक्षाच्या सैनिकांच्या मदतीने ९ महिने युद्ध छेडले. या नऊ महिन्यांमध्ये १ ते ३ दशलक्ष लोक मारले गेले आणि २००,००० ते ४००,०००
महिलांवर बलात्कार
झाले. यासगळ्याचे अनेक वाईट परिणाम झाले.
म्हणून, हे युद्ध बांगलादेशच्या लोकांनी, ज्यात बंगाली लोक आणि आदिवासी सुद्धा होते, पाकिस्तानी सैनिकांविरुद्ध लढलं. या युद्धाचा परिणाम म्हणजे बांगलादेशला स्वातंत्र्य मिळालं. त्या काळात माझे वडील ललित कला विद्यापीठात स्कूलमध्ये ‘ललित कला' शिकत होते. ढाक्याच्या 'चारुकोला' मध्ये ते कलेचा अभ्यास करत होते. माझे वडील इतर अनेक तरुणांप्रमाणेच स्वातंत्र्यसैनिक म्हणून या चळवळीत सामील झाले. इथेच त्यांना खऱ्या अर्थाने राजकारणात रस निर्माण झाला. आज बांगलादेशात परिस्थिती खूप कठीण आहे, कारण गेल्या उन्हाळ्यात शेख हसीनांचं सरकार पडलं. पण त्यावेळी 'अवामी लीग' हा बांगलादेशचा संस्थापक आणि सर्वात जुना पक्ष होता. त्याची स्थापना १९४९ मध्ये झाली होती आणि शेख मुजीबुर रहमान यांच्या नेतृत्वाखाली याच राजकीय पक्षाने बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून दिलं. माझे वडील त्यांच्या विचारांच्या खूप जवळ होते. शेख मुजीबुर रहमान(ज्यांना "बंगबंधू" सुद्धा म्हणतात) यांनी माझ्या वडिलांना पॅरिसला जाण्याचा सल्ला दिला होता. पण, माझ्या वडिलांनी कधीही उमेदवार म्हणून थेट राजकारण केलं नाही. ते नेहमीच एक कलाकार आणि बुद्धिजीवी म्हणून आपलं काम करीत राहिले.
अनुबंध: तुम्ही जे काही सांगता ते माझ्यासारख्या भारतातील लोकांसाठी महत्त्वाचं आहे, जे पश्चिम बंगालचे रहिवासी नाहीत. विशेषतः
भारताच्या मध्य किंवा दक्षिण भागातून आलेल्या लोकांना १९७१ च्या युद्धाचा इतिहास फारसा माहीत नाही किंवा असेल
तर बऱ्याचदा चुकीचा माहीत आहे. उदाहरणार्थ, काही वर्षांपूर्वी मी त्रिपुराला(अगरताळा)गेलो होतो आणि तिथे मी त्रिपुरा राज्य संग्रहालयाला भेट दिली. तिथे त्या युद्ध काळाचं खूप तपशीलवार वर्णन केलं होतं. मला तिथे अनेक
नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या.
आता तुमच्याकडे परत येऊया. कृपया तुमच्या सुरुवातीच्या शिक्षणाबद्दल थोडं सांगाल का? म्हणजे तुमच्या Lycée
(उच्च माध्यमिक शाळा) पर्यंत, जिथे तुम्ही क्लोद मोने (Claude
MONET) Lycée मध्ये होता. १९९० च्या दशकात पॅरिसमध्ये बांगलादेशी
म्हणून मोठं होणं कसं होतं? कृपया सांगाल का?
शारजा: मला वाटतं की मी शिक्षणाबद्दलच्या दोन महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकेन. पहिली म्हणजे भाषा. आम्ही घरी बंगालीत बोलत होतो. माझ्या आईने आम्हाला अक्षर ओळख, लेखन, वाचन या बाबतीत शिक्षण दिलं. त्यामुळे माझी मातृभाषा बंगाली आहे आणि मी फ्रेंच शिकले कारण आम्ही फ्रेंच वातावरणात होतो. तरीही माझ्या आईने आम्हाला इंग्रजी शिकवण्यासाठी खूप आग्रह धरला, कारण आमच्या घरी नेहमी बरेच पाहुणे, आई-वडिलांचे मित्र-मैत्रिणी येत असत. त्यामुळे मी बर्याच लहान असतानाच इंग्रजी शिकले. त्यानंतर, सर्वात महत्त्वाचं म्हणजे बंगाली होतं. मला ते खूप आवडलं कारण मी ते माझ्या बहिणीसोबत शिकत होते. मी २ वर्षांची असताना ती आधीच ५ वर्षांची होती. मी नेहमी माझ्या आई आणि बहिणीसोबत असायचे. साधारण ५ किंवा ६ वर्षांची असताना, आमच्यासाठी एक थोडी कठीण गोष्ट होती ती म्हणजे शनिवार – रविवारी आम्हाला
नेहमी बंगालीमध्ये एक पान लिखाण करावं लागायचं. त्यामुळे ते अतिरिक्त काम असायचं. आता
हे खूप गमतीशीर वाटतं, पण त्यावेळी ते आमच्यासाठी
सक्तीचं होतं.जणू काही एक कर्तव्यच आणि आईच्या
आग्रहाने आम्हाला लिहावं लागायचं. अर्थात
त्यामुळे आम्हाला सराव करता येत होता.
आम्हाला ते तेव्हा तसे का करावं लागायचे हे मला आता समजतं, पण इतर मुलांपेक्षा ते थोडं जास्त कठीण होतं कारण आम्हाला बरेच अधिक काम करावं लागायचं. माझ्यासाठी, माझी आई एक दृष्टी व्यक्ती होती, कारण ती नेहमी आम्हाला सांगायची, तुमची बंगाली ओळख खूप मौल्यवान असेल. जसं की तुम्हाला हा सगळा अभ्यास करायचा आहे कारण तुम्हाला तुमची ओळख, तुमची मुळं(roots) माहिती
असायला हवीत. म्हणूनच, मी लहान असताना मला बंगाली असण्याचा खूप अभिमान होता. आम्ही पॅरिसच्या १३ व्या उपनगरात (arrondissement) मोठे झालो. हे "Place d’Italie" (प्लास दिताली) आणि "National" (नासियोनाल) यांच्या जवळ आहे. ऐतिहासिकदृष्ट्या हा चिनी आणि व्हिएतनामी लोकांचा भाग आहे. तेव्हा काळापासून आज तो खूप बदलला आहे, तरीही तिथे अजूनही अनेक चिनी आणि व्हिएतनामी खानावळी आहेत. त्यामुळे मी या वातावरणात खूप आरामात वाढले. मला याची जाणीव होती की हा भाग दुहेरी ओळख असलेल्या लोकां चा आहे. गेल्या
३० वर्षांत इथली बदललेली आणि थोडी मनोरंजक गोष्ट म्हणजे, त्या वेळी या भागात एकही बंगाली माणूस नव्हता. आता ते खूप बदललं आहे.
आम्ही एक प्रकारे जुने-नवीन लोक होतो पण खूप चांगल्या अर्थाने. मला इतरांपेक्षा थोडं वेगळं असल्याचा खूप अभिमान असायचा. मला नेहमी वाटायचं की माझे हे वेगळेपण माझ्यासाठी चांगले असेल. आणि मी त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग करू शकेन. मी लहान असताना असा विचार केला नव्हता बरं. पण स्वतःची अशी दुहेरी
ओळख असल्यामुळे मी स्वतःमध्ये समाधानी होते.
अनुबंध: बरोबर. मला वाटतं कि आपल्या
अस्तित्वाचा (identity) हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. आपण आपली ओळख कशी मानतो आणि इतरांना ती कशी दिसते यावर आपण थोड्या वेळाने बोलू. सध्या मात्र आपण भाषेच्या त्याच प्रश्नावर टिकून राहूया. माझ्याकडे दोन प्रश्न आहेत. मला माहीत आहे की तुम्ही शाळेत लॅटिन सुद्धा शिकला होता, बरोबर. तुम्ही अजून कोणत्या भाषा शिकला आहात का? बंगाली तुम्ही वाचता आणि लिहिता सुद्धा का? होय असल्यास, साधारणतः
किती सातत्याने?
शारजा: बरं, दोन्ही प्रश्न जोडलेले आहेत, कारण मी लहान असताना बंगाली शिकले होते. लहानपणापासूनच मला भाषांचं खूप आकर्षण आहे. माझे आई-वडील दोघेही साहित्य आणि कला क्षेत्रातले आहेत. तसंच, बंगाली ही आता जगात सहावी किंवा आठवी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. पण फ्रान्समध्ये, मी लहान असताना ती एक खूप दुर्मिळ भाषा होती. मला नेहमीच भाषांचं आकर्षण होतं आणि म्हणूनच मी १८ वर्षांची होईपर्यंत लॅटिन शिकले. मी लॅटिनमध्ये अजिबात चांगली नव्हते, जरी मला बारावीत (baccalaureate) चांगले गुण मिळाले होते. मला त्यात खूप गती नव्हती पण मला ते शिकायला खूप
आवडलं! आम्ही आमच्या कुटुंबात खूप वाचन करायचो. त्यामुळे व्युत्पत्ती(etymology), शब्दसंग्रह(vocabulary), लेखन (writing) या दृष्टीने लॅटिन महत्त्वाचं आहे हे सुद्धा मला माहीत होतं. जेव्हा तुम्ही लॅटिन शिकता तेव्हा चुका न करणे महत्वाचं असतं. मला लॅटिनचं आकर्षण होतं आणि ज्या भाषा फारसे लोक बोलत नाहीत, त्याबद्दलही मला नेहमीच आकर्षण होतं. त्यामुळे नंतर जेव्हा मी सियांसपो(Sciences Po) मध्ये राज्यशास्त्राचा अभ्यास करत होते तेव्हा मी चार वर्षं हिब्रू सुद्धा शिकले. आता खरंतर मला त्याचा खूप विसर पडला आहे कारण मला सराव करायला हवा. तरीही मी ते शिकले. यातही
मी खूप पारंगत नव्हते पण मला ते शिकायला खूप आवडलं. आमच्या सियांसपोच्या काळात, आम्हाला एक वर्ष परदेशात जावं लागतं. मला खरंतर जायचं नव्हतं... मला माफ करा, मी आता तुम्हाला जे सांगणार आहे त्यासाठी. कदाचित काही लोकांना लक्ष केल्यासारखे
ते वाटेल पण मला खरोखर अमेरिकेला जायचं नव्हतं. मला वाटायचं कि जगात इतके देश असताना मी अमेरिकेला का जाऊ? विशेषतः, कारण मी त्या वेळी इतकी समजूतदार नव्हते. १९७१ च्या युद्धात अमेरिकेने पाकिस्तानी सैन्याला पाठिंबा दिला होता. त्यामुळे मी ठरवलं की मला त्या देशात नाही जायचं. मला इंग्रजीचा सराव
करायचा होता पण मला अशा ठिकाणी जायचं होतं जिथे मला पूर्वी पासून काहीच माहीत नाही. मला केनियाचं खूप आकर्षण होतं. आणि केनियामध्ये असताना मी स्वाहिली शिकायला सुरुवात केली.
अनुबंध: भारी!
शारजा: पण मी आता हिब्रू किंवा स्वाहिली बोलू शकत नाही, जरी मी त्या भाषा शिकल्या आहेत. मी किमान या भाषांची रचना (structure), कल्पना (ideas), व्याकरण (grammar) आणि त्यांचा ध्वनी (sonorities)
यांच्याशी स्वतःला जोडून घेऊ शकते. सध्या मी बंगाली बोलते, जे मी वाचते आणि लिहिते. मी ते INALCO मध्ये थोडं शिकवते सुद्धा. माझ्या आईसाठी हा सर्वात महत्त्वाचा पैलू होता. ती नेहमी म्हणायची, "जर तुम्हाला एखादी भाषा वाचता आणि लिहिता येत नसेल, तर तुम्ही ती भाषा बोलता असं म्हणू शकत नाही". तर बंगाली, इंग्रजी आणि फ्रेंच या खऱ्या अर्थाने मी बोलू शकते. स्पॅनिश मी शिकत आहे, त्यामुळे मी ते समजू आणि वापरू शकते. पण, स्वाहिली आणि हिब्रू या अशा भाषा आहेत ज्यावर आपण चर्चा करू शकतो, पण मला खात्री नाही की मी त्यांमध्ये कुठले
शैक्षणिक काम करू शकेन. थोडक्यात, मला त्या भाषांचा अभ्यास करायला खूप आनंद झाला.
अनुबंध: माझ्या मते तुम्ही एक बहुभाषिक(polyglot) आहात आणि आपण किमान असं म्हणू शकतो की तुम्हाला भाषांचं खूप वेड आहे.
शारजा: हो.
अनुबंध: चला, पुढे जाऊया. क्लोद मोने
(Claude MONNET) उच्च माध्यमिक विद्यालय बद्दल. भारतातील काही लोकांना तरी क्लोद
मोने या पुनर्जागरण कलाकाराबद्दल (renaissance
artist) माहीत आहे. याच शाळेत तुम्ही लॅटिन शिकला आहात. तुम्ही नाट्य
(theatre) आणि तत्त्वज्ञान (philosophy) सुद्धा
शिकला आहात. तुम्ही तिथे तुमची बारावीची परीक्षा (baccalaureate) दिली आहे. आणि फ्रान्समध्ये
बारावीच्या वर्षात तत्त्वज्ञान हा अनिवार्य विषय असतो, नाही का?
शारजा: हो.
अनुबंध: भारतीय प्रेक्षकांसाठी ही गोष्ट खूप नवीन आहे. तर, कृपया आम्हाला क्लोद मोने उच्च
माध्यमिक विद्यालयमधील तुमच्या या अनुभवाबद्दल सांगाल का?
शारजा: हो, मी तत्त्वज्ञानाच्या गोष्टीपासून सुरुवात करेन. आता फ्रान्समधील शिक्षण पद्धतीत अनेक पर्यायांच्या बाबतीत खूप बदल झाले आहेत. प्रत्येकाची गोष्ट सारखी नसते. परंतु हे खरं आहे की आमच्यासाठी तत्त्वज्ञानाची ओळख उच्च
माध्यमिक विद्यालयत झाली. मला इथे सांगायचं आहे की तत्त्वज्ञान खरोखर तुम्ही कोणत्या शिक्षकाकडून शिकता यावर अवलंबून असतं. कारण गोष्टी समजून घेण्याची ही एक खूप वेगळी पद्धत आहे. मला वाटतं की आपण ते खूप लवकर, उच्च
माध्यमिक विद्यालयाच्या खूप आधीपासून शिकायला हवे. मी फक्त माझ्यासाठी खरोखर काय महत्त्वाचं होतं यावर लक्ष केंद्रित करेन. विशेषतः नाट्य(theatre), कारण माझं क्लोद मोने उच्च
माध्यमिक विद्यालय... आणि इथे मी माझ्या शाळेला खूप खूप धन्यवाद देईन, कारण ती खूप चांगली होती. ती अनेक पर्याय असलेल्या मोजक्या शाळांपैकी एक होती. त्यांच्याकडे संगीत पर्याय, नाट्य पर्याय होता,
ज्याचा अर्थ असा की त्यांच्याकडे यासाठी शिक्षक होते. खूप साधनं होती. अमाप पैसा नसला
तरी निदान शिक्षकांचं लक्ष नाट्य शिकवण्याकडे असायचं. योगायोगाने इतर शाळांमध्ये तसं नव्हतं. कारण या सगळ्याला
बर्यापैकी पैसे लागतात. आणि अशा गोष्टींमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा प्रत्येकाला नसते.
क्लोद मोने उच्च माध्यमिक विद्यालयात आम्ही सर्वांनी खूप मजा केली. माझे जे चांगले मित्र अजूनही आहेत, ते सगळे वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आले होते. नाट्य पर्यायामुळे आम्ही एकदा Bertolt BRECHT (बर्तोल्त ब्रेष्ट) या जर्मन नाट्य
लेखकाचं नाटक सादर केलं. आम्ही हे नाटक केलं आणि या नाट्य पर्यायामुळेच मला नाट्य म्हणजे
काय याची जाणीव व्हायला लागली. जरी मी कला-प्रदर्शनांच्या (vernissage) पार्श्वभूमीतून आले असले तरी, नाट्यगृहात(theatre) जाणं हे माझ्यासाठी एक शिक्षण होतं. ती एक वेगळी संस्कृती आहे. या पर्यायामुळे मला नाटकाशी खूप जवळून परिचित वाटू लागलं. हे सर्व मी तुम्हाला सांगत आहे कारण मला वाटतं की यामुळेच मला नाट्य महोत्सवांचं आकर्षण वाटलं. आम्ही एक नाट्य महोत्सव आयोजित करतो. आता तुम्ही मला विचारत आहात त्यामुळे माझ्यासाठी या शाळेच्या अनुभवाचा विचार करणं आणि गेल्या सात वर्षांपासून "तोजूर
महाउत्सव (Toujours festival)" साठी आम्ही नाटकाला इतका वेळ का देत आहोत हे समजून घेणं सोपं आहे.
अनुबंध: धन्यवाद. जर मी बरोबर समजलो असेन तर तुम्ही दोन पदव्यांसाठी
परीक्षा दिल्यात. एक २००९ ते २०१३ दरम्यान सियोंसपो मधून आणि दुसरी पॅन्थेऑ सोर्बोन विद्यापीठातून. आणि सियोंसपो मधील तुमचे विषय होते... तुम्ही तिथे एका प्रवासी समितीची अध्यक्षा सुद्धा होता, नाही का...? जर हे चुकीचे असेल तर तुम्ही मला दुरुस्त कराल. ते युनायटेड नेशन्स (UN)
साठी होतं आणि तिथे पार्टी सोशालिस्ट(Party Socialist) चा जीन ZAY हा विभाग आहे जिथे तुम्ही सक्रिय सदस्य सुद्धा होता. सोर्बोनमध्ये तुम्ही इतिहास, कला, पुरातत्वशास्त्र (archaeology) आणि सिनेमा शिकला आहात. हा सगळा अनुभव कसा होता आणि तुम्ही एकाच वेळी दोन पदव्या
घेण्याचा निर्णय कसा काय घेतलात?
शारजा: माझं मुख्य लक्ष आणि माझा मुख्य अभ्यास सियोंसपो मध्ये राज्यशास्त्र होता. पण, माझ्या पदवीच्या पहिल्या वर्षात, खूप प्रशासकीय गोष्टी सुरु होत्या. ते एका खूप नावाजलेल्या महाविद्यालयात माझं पहिलं वर्ष होतं. काही विषयांत मी नापास झाले आणि त्यामुळे मी खूप निराश झाले. म्हणून मी माझा वेळ वाया न घालवण्याचे ठरवले. मला कलेच्या इतिहासात (history of art) सुद्धा खूप रस आणि आकर्षण होतं. बरं
एकटा राज्यशास्त्राचा अभ्यासच तसा खूप होता. असं सांगणं आता सोपं आहे पण या छोट्याशा
अपयशामुळे मी सोर्बोनमध्ये कलेचा इतिहास शिकायला सुरुवात केली. हा अभ्यासक्रम चार वर्षांचा
होता. हे सगळं वेळ व्यवस्थापनावर(time management) अवलंबून होतं. मी काही वर्गांना जाऊ शकले, काहींसाठी परीक्षा नंतर देऊ शकले, इत्यादी. त्यामुळे मी ते सियोंसपोपेक्षा खूप सोप्या पद्धतीने केलं. मला आठवतं की मी फक्त इतिहास, ग्रीसचं पुरातत्वशास्त्र, कला इत्यादी वर्गांचा आनंद घेऊ शकले. हे राज्यशास्त्रापेक्षा खूप हलकं होतं. अशा प्रकारे त्याची सुरुवात झाली. खरं तर ते एका प्रकारच्या छोट्याश्या शैक्षणिक अपयशामुळेच घडलं. अशा प्रकारे मी दोन पदव्या प्राप्त
केल्यात. शेवटी हे दोन्ही अभ्यासक्रम एकमेकांना पूरक होते.
राज्यशास्त्राची पदवी तशी खूप पारंपरिक आहे. त्यात राज्यशास्त्र, इतिहास, अर्थशास्त्र, दीर्घ अर्थशास्त्र (macroeconomics) आणि सूक्ष्म अर्थशास्त्र(microeconomics) असतात. त्या बाबतीत, मी सूक्ष्म अर्थशास्त्रात खरोखरच खूप कच्ची होते. हे बर आहे. निदान तुम्हाला यानिम्मिताने
कळतं की तुम्ही एखाद्या गोष्टीत प्रतिभावान आहात का नाही. कलेच्या इतिहासात(history of art) आम्हाला एका विशिष्ट कलेच्या प्रकारावर लक्ष केंद्रित करावं लागलं. मी सिनेमावर लक्ष केंद्रित केलं आणि मला ते खूप आवडलं, कारण त्यातून खूप काही शिकायला मिळतं.
तशी मी नेहमीच अनेक संस्थांशी(associations) जोडलेली होते. मी सियोंसपो मध्ये असताना पहिल्यांदा एका संस्थेत सामील झाले. ती संयुक्त
राष्ट्रसंघासाठी (UN) सियोंसपो होती. त्यात अनेक विद्यापीठांचा सहभाग असतो. भारतात सुद्धा ते आहे. हे यूएनचं एक मॉडेल आहे. ही संस्था जगभरात यूएनची अशी मॉडेल स्थापन करते. मी उपाध्यक्ष(Vice President) होते आणि मी प्रवासी समितीची(traveling committee) जबाबदारी सांभाळत होते. आम्ही रशियाला, मोरोक्कोला इत्यादी ठिकाणी गेलो. यात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही जगभरातील महत्वाच्या व्यक्तींना, उत्कृष्ट विद्यार्थ्यांना भेटता. आणि प्रत्येकाला आंतरराष्ट्रीय संबंधात खूप रस असतो. आणि सगळे सभासद विविध देशांच्या नागरिकांप्रती उत्सुक
असतात. मला राजुशास्त्राच्या क्षेत्रात आता १५-१७
वर्षे झाली आहेत. त्यावेळी मला आशा होती की मुत्सद्देगिरी(diplomacy) हे एक चांगलं साधन असेल. मला यूएनमध्ये खूप रस होता आणि माझ्या विचारसरणीच्या बैठकीसाठी ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मला नेहमीच डाव्या पक्षांच्या
विचारांमध्ये खूप रस होता. सिनेमाच्या बाबतीत सुद्धा. मला गोदार्द (GODARD) चा "ला शिनवाज (La Chinoise)" नावाचा एक चित्रपट आठवतो. उच्च माध्यमिक विद्यालयात मी आधीच निदर्शने(demonstrations) करत होती. मला त्यावेळी पार्टी सोशालिस्टमध्ये(PS) सामील होण्यासाठी बोलावलं गेलं. पुन्हा, हे सगळं आता खूप वेगळं आहे कारण फ्रान्समधील डाव्या विचारांच्या पक्ष्यांच्या रचनेत खूप बदल झाले आहेत. पण त्यावेळी माझ्यासारख्या विद्यार्थ्याला पार्टी सोशालिस्टमध्ये रस असणं सामान्य होतं. तरीही, बरेच लोक राजकारणात तितके सक्रिय नव्हते. मी हे कबूल करते की आज मी पार्टी सोशालिस्टपेक्षा कितीतरी जास्त डावी आहे.
अनुबंध: तुम्ही
गोदार (GODARD) बद्दल उल्लेख केला. त्याचे चित्रपट जसे "पिरो ल फ़ू" (Pierrot
le Fou), "वीकेंड" (weekend) भारतात खूप प्रसिद्ध आहे. आता, आपण सियोंसपो (Sciences Po) येथे केलेल्या तुमच्या डॉक्टरेटबद्दल थोडं बोलूया. ते पॅरिस स्कूल ऑफ इंटरनॅशनल अफेअर्समध्ये(Paris School of International Affairs) होतं. तुम्ही तिथे आंतरराष्ट्रीय सुरक्षा(international security) या विषयावर काम केलं. तुम्ही आफ्रिकेतील समस्यांवर सुद्धा काम केलं. सियोंसपो मधील तुमच्या उच्च स्नातक पदवी(Masters) अनुभवाबद्दल तुम्ही आम्हाला सांगू शकाल का?
शारजा: हो, नक्कीच. मला हे सांगायचं आहे की सियोंसपो हे एक असे विद्यापीठ आहे जे विविध पर्याय (options) देते. वैयक्तिकरित्या मी खूप आनंदी होते कारण मला नेहमीच चांगले अभ्यासक्रम आणि चांगले शिक्षक मिळत गेलेत. केनियामध्ये परदेशात माझ्या तिसऱ्या वर्षानंतर मी एक इंटर्नशिप(internship) केली. इतर बहुतेक विद्यार्थी दुसर्या
देशांत जाऊन शिकत होते परंतु मला मात्र कामाचा अनुभव हवा होता. मी नैरोबी येथील फ्रेंच दूतावासात(French Embassy) इंटर्नशिप केली. तिथे मला आठ किंवा नऊ पूर्व आफ्रिकन देशांसाठी दृकश्राव्य सहाय्यक(audiovisual assistant) म्हणून काम करण्याची संधी मिळाली. केनियामध्ये राहून मी इथिओपिया(Ethiopia), युगांडा(Uganda), टांझानिया(Tanzania) आणि रवांडा(Rwanda) सारख्या इतर देशांवर काम करू शकले किंवा त्याबद्दल माहिती मिळवू शकले. यामुळे माझा दृष्टिकोन आणि लक्ष इतर राजकीय समस्या आणि क्षेत्रांवर केंद्रित होऊ लागलं. म्हणूनच मी आफ्रिकन खंड निवडला.
त्या वेळी, मला आंतरराष्ट्रीय सुरक्षेशी(international security) संबंधित सर्व गोष्टींमध्ये खूप रस होता. मला आठवतं, मी असे वर्ग घेतले होते जिथे मला एक छोटा निबंध(memoir) लिहावा लागला होता. तो राफाल (Rafale) या विमानावरचा एक छोटा निबंध होता. इथेच आपल्याला आपली मूल्यं काय आहेत हे सुद्धा कळतं. खरा पैसा कुठे आहे? जेव्हा मी म्हणते की पैसा कुठे आहे तेव्हा त्याचा अर्थ पैसा आंतरराष्ट्रीय सुरक्षेत आहे! तुम्हाला दिसतं की ते शस्त्र विक्री(arms selling) किंवा संरचयांशी(structures) जोडलेलं आहे. तुम्हाला तेव्हा कळतं की जर तुम्ही वकिली(advocacy) केली तर तुम्ही ती शस्त्रं विकणाऱ्या कंपन्यांसाठी कराल. इथेच तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करता जगाबद्दलची माझी दृष्टी काय आहे? खरंच, शस्त्रात्र विकणं हा शांतता राखण्याचा एक मार्ग आहे का? असं बोलल्याबद्दल माफ करा पण मला वाटलं की हे प्रश्न खूप 'आकर्षक' (sexy) होते. राफाल इत्यादीबद्दल बोलणं आणि काम करणं. हळूहळू, याबाबत माझं मत सुद्धा बदललं. आणि मला वाटलं, माझा यावर खरोखर विश्वास नाही. जर तुम्ही असा देश बनवला जिथे संपूर्ण अर्थव्यवस्था राफेलसारखी शस्त्रं विकण्यावर आधारित आहे, तर तुम्ही शांतता प्रक्रिया(peace process) आणि शांतता अभ्यासात(peace studies) सामील होऊ शकाल, यावर माझा खरोखर विश्वास नाही. त्यामुळे मला काय खरच काय हवं आहे हे सुद्धा मला कळू लागलं. बरं, याबद्दल नंतर बोलणं खूप सोपं आहे. कारण आता तुम्ही तुमच्या आयुष्यातील तारे तर्काने जुळवण्याचा प्रयत्न करता. मला खात्री नाही की त्यावेळी हे सगळं माझ्यासाठी इतकं स्पष्ट होतं माझे शिक्षण
हे माझे शिक्षक, इतर क्षेत्रांची, विषयांची ओळख आणि लोकांशी संवाद साधण्याच्या बाबतीत खूप चांगले होते.
अनुबंध: तुम्ही उल्लेख केलेल्या युद्ध आणि शस्त्रांबद्दल बोलताना एक आठवतंय. मी अलीकडेच प्रसिद्ध भारतीय लेखिका अरुंधती रॉय(Arundhati Roy) यांची एक टिप्पणी वाचली. त्या म्हण्याल्या की पूर्वी आम्ही युद्धांसाठी शस्त्रं निर्मिती करायचो. आज गणित उलटं आहे. आज शस्त्रं विकण्यासाठी आम्हाला युद्धांची गरज आहे!
शारजा: अगदी बरोबर! खूप खूप धन्यवाद. कारण त्या माझ्यापेक्षा खूप चांगल्या प्रकारे हे मांडतात. मला नेमके
हेच म्हणायचे होते. अर्थातच जर तुमच्याकडे हजारो शस्त्रं असतील तर तुम्हाला ती विकावीच लागतील. आपल्यासाठी सुद्धा ते समजण स्वाभाविक आहे. हे आपण सगळीकडे पाहतो आहोत. उदाहरणार्थ, गेल्या १५ वर्षांपासून, सगळी युद्धं वर्षानुवर्षे सुरू आहेत... आणि यामागे नक्कीच काहीतरी कारण आहे.
अनुबंध: आणखी एक म्हण माझ्या मनात येते. मला माहीत नाही ती कोणी म्हटली आहे पण ते म्हणतात “तुम्ही बॉम्बने जगाची छक्कले उडवू
शकता परंतु एक बॉम्ब उडवून जगात शांतता प्रस्थापित मात्र करू शकत नाही”.
बरं, पुढे जाऊया. डॉक्टरेटसाठी आंतरराष्ट्रीय संबंधानंतर तुम्ही EHESS (École des Hautes Études En Sciences Sociales - “इकोल दे ओत एत्युद ओं सियोंस
सोसिआल”) मध्ये एक वेगळा विषय निवडला. हे भारतीय आणि दक्षिण आशियाई अभ्यास केंद्र(Center for Indian and South Asian
Studies) आहे. इथे तुम्ही बांगलादेशातील राज्य(state), धर्म(religion) आणि समाज(society) यांचा, धर्मनिरपेक्षता(secularism) आणि इस्लामवाद(Islamism) यांच्या संदर्भात अभ्यास केला. तुमच्या प्रबंधाचे(thesis) संचालक
मिशेल बोइव्हया (Michel BOIVIN) होते हे ऐकून मला आश्चर्य वाटलं.
त्यांनी अनेक महत्वाची पुस्तकं लिहिली आहेत. उदाहरणार्थ, त्यांचं पुस्तक "पाकिस्तानमधील सिंधच्या सुफी संस्कृतीचा ऐतिहासिक शब्दकोश(Historical dictionary of the Sufi
culture of Sindh in Pakistan)". नुकतंच मला सियोंस पोच्या लोरों गेये (Laurent GAYER) यांची मुलाखत घेण्याचा आनंद मिळाला आणि त्यांनी तेव्हा मिशेल
बोइव्हयाबद्दल उल्लेख केला. तेव्हा कृपया तुमच्या डॉक्टरेटच्या या अनुभवाबद्दल सांगू शकाल का?.
शारजा: या प्रश्नासाठी खूप खूप धन्यवाद. याच्या
उत्तरात मी तुम्हाला दाखवू शकेन की माझ्या ओळखीने माझ्या पीएचडी प्रबंधाला(PhD thesis) कसा आकार दिला आणि मी काय काम केलं. माझ्या शालेय जीवनात मला खात्री होती की माझी बांगलादेशी आणि बंगाली ओळख खूप महत्त्वाची आहे. मला खरोखरच खात्री पटली होती की जर मी संशोधन करणार असेल तर मला काहीतरी वेगळं काम करायला पाहिजे. कदाचित आज मी असं म्हणते तेव्हा ते खूप मूर्खपणाचं वाटेल, पण त्या वेळी मला खात्री होती की मला एखादी नवी भाषा शिकण्याची गरज आहे. अशा प्रकारे, स्वाहिली शिकण्याचा योग आला. मला दुसऱ्या
(बांगलादेश सोडून) संशोधन विषयावर काम करायची इच्छा होती. मला असं वाटलं होतं की बांगलादेशवर काम करण्याची काही गरज नाही. मला खरोखर असेच वाटत होते. त्यामुळे, मी कट्टरतावादाच्या (radicalization) प्रक्रियेवर, कदाचित केनियामध्ये आणि
इतर देशांकडे अधिक लक्ष केंद्रित करत होते. पण, २०१५ मध्ये मी पदवीधर(graduated) झाल्यावर खूप काही घडलं. मी एका विचित्र महिलेसोबत(crazy woman) नवीन नोकरी सुरू केली. ती व्यक्ती जरा कठीण स्वभावाची होती. आणि या अनुभवामुळे, सहा महिन्यांनंतर, मला एकप्रकारे नैराश्य(burnout) आले. जेव्हा मी पदवीधर झाले, तेव्हा मला आधीच माहीत होतं की मला संशोधन करायचं आहे, पण मला नोकरीची संधी मिळाली होती. मी तेव्हा तरुण होते. मला वाटतं मी २३ वर्षांची असेन. त्यामुळे मी त्या नोकरीला हो म्हटलं. मी त्या विचित्र महिलेसोबत होते हे या पहिल्या नैराश्यामागचं एक कारण होतं.
आणि मला हे सुद्धा आठवतं की १ जुलै २०१६ रोजी ढाक्यातील होली आर्टिसन बेकरीमध्ये(Holey Artisan Bakery) पहिला हल्ला झाला होता. तो राजनयिक क्षेत्रात(diplomatic area) होता आणि इस्लामिक स्टेट (Islamic State) या संघटनेने परदेशी आणि बांगलादेशी लोकांविरुद्ध तो घडवून आणला होता. या दोन घटनांमुळे मला पुन्हा संशोधन करायची इच्छा आणि कल्पना मनात आली. माझ्या मनात ते होतंच. प्रत्येक वेळी तुम्हाला असं वाटतं की तुम्ही संकटात सापडला आहात पण मग सगळ जग तुमच्या
मदतीला धावून येत. इथेच संशोधन करायची ही कल्पना जन्माला आली. मला माहीत होतं की मला EHESS (École des Hautes Études En Sciences Sociales) मध्ये संशोधन करायचं आहे. हे ऐतिहासिकदृष्ट्या असे महाविद्यापीठ आहे जिथे मानववंशशास्त्रज्ञ(anthropologist) क्लोद लेव्ही-स्त्रोस (Claude LÉVI-STRAUSS) सारखे मोठे व्यक्ती काम करून गेलेत. मानववंशशास्त्रातील ही सर्व खूप
महत्वाची नावं. त्यामुळे मी सियोंस पोमध्ये राज्यशास्त्र केले, जे माझ्यासाठी एक उत्तम महाविद्यापीठ होतं आणि मला ते खूप आवडले. मला खरोखरच अधिक मानववंशशास्त्रीय(anthropological), समाजशास्त्रीय(sociological) दृष्टिकोन ठेवून EHESS मध्ये अभ्यास करायचा होता.
मला माहीत होतं की ह्या महाविद्यापिठाची चांगली प्रतिष्ठा आहे. म्हणून माझ्यासमोर ही पुढील दोन उद्दिष्टे होती: बांगलादेशवर संशोधन आणि EHESS मध्ये शिक्षण. मला वाटतं १ जुलैच्या हल्ल्यामुळे माझ्या विचारांना गती मिळाली. मला आठवतं, मी खरंच ख्रिस्तोफ जाफ्र्लो(Christophe JAFFRELOT) यांच्याशी बोलायला गेले होते, कारण मी त्यांना सियोंसपो पासून ओळखत होते. त्यांच्यासोबत माझा एक खूप चांगला वर्ग होता. मला आठवतं की मी पश्चिम बंगाल(भारत)आणि बांगलादेश यांच्या सीमेवर काय घडत आहे, कदाचित कट्टरतावादावर काहीतरी संशोधन करण्याच्या विचारात होते. कारण तो असा काळ होता जिथे हे सर्व घडत होतं. माझ्या मनात आंतरराष्ट्रीय सुरक्षा, इत्यादी गोष्टी होत्या. मला वाटतं, त्या वेळी बांगलादेश फ्रेंच विचार कक्षेत तितकासा महत्वाचा नव्हता.
हे खरोखर एका व्यक्तीमुळे शक्य झालं, ज्याचे मी इथे आभार मानू इच्छिते. ते आहेत जों-ल्यूक रासीन (Jean-Luc RACINE), जे आता निवृत्त
प्राध्यापक (Professor Émérite) आहेत. ते EHESS मध्ये प्राध्यापक होते. ते निवृत्त होत असताना मी त्यांच्याकडे गेले, त्यामुळे ते मला विद्यार्थी म्हणून घेऊ शकले नाहीत. तरीही मी त्यांच्याकडे गेले, मी त्यांना माझी माहिती(profile) दिली, मी आजवर काय काम केलं, इत्यादी समजावून सांगितलं. आणि ते म्हणाले, "आम्हाला बांगलादेशवर काम करणाऱ्या कोणाची तरी गरज आहे!" कारण फ्रान्समध्ये, बांगलादेशवर काम करणारा किंवा पीएचडी किंवा अशा शैक्षणिक स्तरावर प्रबंध सादर करणारा तेव्हा कोणी नव्हता. मला कोणाची तरी गरज होती, मला प्रशिक्षण देण्यासाठी नाही तर माझे पीएचडी पर्यवेक्षक(PhD supervisor) होण्यासाठी. अशा प्रकारे, त्यांच्यामुळे मी मिशेल बोइवि (Michel BOIVIN) ला भेटले. मी खरोखर आनंदी आहे आणि मिशेलची आभारी आहे कारण त्यांनी मला होकार दिला. ते पाकिस्तानीतील सिंध प्रदेशाचे तज्ञ आहेत . ते इतिहासकार(historian) आणि इस्लामशास्त्रज्ञ (islamologist) आहेत. आमच्या दोघांचा वैचारिक दृष्टिकोन सारखा नाही, पण ते इतिहासकार आणि इस्लामशास्त्रज्ञ आहेत या गोष्टीने मला खूप मदत झाली. प्रत्येक वेळी त्यांचा शब्दांचा,
संकल्पनांचा अर्थ तपासण्याचा एक विशिष्ट दृष्टिकोन होता. मी त्यांच्याकडून ही एक महत्वाची बाब शिकले. उदाहरणार्थ, तेच असे पहिले व्यक्ती होते जे म्हणाले, "बांगलादेशसारख्या ९१% मुस्लिम बहुसंख्य देशाने 'धर्मनिरपेक्षता'
(secularism) परिभाषित करण्यासाठी 'धर्मो निर्पेक्ष' ह्या शब्दाचा
आपल्या संविधानात वापर करणं हे तसं नवलाईचे आहे. हा शब्द खूप संस्कृत धाटणीचा आहे. मात्र
इतर बहुतेक मुस्लिम देशांसाठी(सगळ्यांसाठी नाही), हा शब्द लॅटिनवर आधारित आहे. काहींकडे अरबी(Arabic) शब्दावली असते. मिशेलकडूनच अशा प्रकारची विचारसरणी आणि बौद्धिक स्वातंत्र
मिळाले. अशा प्रकारे मी EHESS मध्ये प्रवेश केला.
अनुबंध: खरंच, सांस्कृतिक, भाषिक, धार्मिक ओळखीतील दुवे खूप मजबूत आहेत. त्यांनी भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश या संपूर्ण प्रदेशावर आपली पकड रोवली
आहे. आता तुमच्या अनेक अनुभवांचा थोडक्यात सारांश घेऊया. हे माझ्यासाठी तसे खूप कठीण काम आहे. आपण त्यांना दोन भागांमध्ये विभागूया. एक जो तुमच्या शिक्षण, संशोधन याच्याशी संबंधित आहे आणि दुसरा जो कला किंवा नाट्य आणि सिनेमा यांसारख्या गोष्टींशी संबंधित आहे. या दोन्हीही महत्त्वाच्या आहेत.
मी वाचल की तुम्ही बांगलादेशात ग्रामीण बँकेसाठी(Grameen Bank) २ महिने काम केलं आहे. जरी हा एक छोटा अनुभव असला तरी मी त्यावर जोर देऊ इच्छितो, कारण तो खूप वैविध्यपूर्ण आहे. एक प्रकारे, तो आम्हाला तुमच्या अनुभवांची विविधता आणि व्याप्ती, तसेच तुमच्या खुल्या मनाची कल्पना देतो. तुम्ही बांगलादेशातील महिला आणि बाल व्यवहार मंत्रालयात एक महिना संसद सहाय्यक(parliament assistant) सुद्धा होता. आपण केनियाबद्दल बोललो, जिथे तुम्ही फ्रेंच परराष्ट्र व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय विकासासाठी (French Foreign Affairs and International Development) काम केलं आहे. तुम्ही "ऐन्स्तित्यु मोंतेन (Institut Montaigne)" मध्ये संशोधन सहाय्यक(research assistant) सुद्धा होता, जे त्यांच्या संशोधन आणि विश्लेषणासाठी फ्रांसमध्ये खूप प्रसिद्ध आहे. काही महिने तुम्ही "राष्ट्रीय शरणार्थी अधिकार न्यायाधिकरण
(National Refugee Rights tribunal)" मध्ये दुभाषी (interpreter)
म्हणून काम केलं आहे. आठ वर्षं तुम्ही "टीच फॉर फ्रान्स(Teach for France)" मध्ये प्रकल्प व्यवस्थापक(project manager) पण होता. तुम्ही " खोलज (Kholeuse)" मध्ये इतिहासाची शिक्षिका होता. तिथे
तुम्ही इतिहास आणि भूगोल दोन्ही शिकवत होता. तसेच तुम्ही "इमुना (Emouna), सिओंसपो पॅरिस" येथे अभ्यासक्रम संचालक(course director) म्हणून शिकवले आहे. तुम्ही फेब्रुवारी २०२४ पासून सिओंसपो, ल आव्र(Le Havre) येथे तात्पुरती शिक्षिका (temporary teacher) म्हणून सुद्धा नियुक्त
आहात. तुम्ही ल आव्र येथे
"ओनसैन्योंत वाकातेर(enseignante
vacataire)" सुद्धा होता. कदाचित, तुम्ही आम्हाला या दोघींमधील फरक सांगू शकाल.
शारजा: बरं, आम्ही जवळजवळ दरवर्षी किंवा प्रत्येक उन्हाळ्यात बांगलादेशला जात असू. मी लहान असल्यापासून मला राजकारण आणि समाजजीवनात रस होता. मी नेहमीच अनेक प्रशिक्षणे घेत आली
आहे. ग्रामीण बँकेसोबतचे प्रशिक्षण खूप छोटे होते. मला वाटत नाही की ते दोन महिने सुद्धा चालले असेल. पण मी ते माझ्या फ्रेंच मित्रांसोबत केले
होये. मला आठवतं, मी इथून माझ्या तीन मित्रांसोबत गेले होते. खेड्यापाड्यात, माझ्या आई-वडिलांशिवाय, कुटुंबाशिवाय, फक्त आम्ही तिघच मित्र एकत्र असतानाचा हा पहिलाच अनुभव होता.
एक गोष्ट तुम्ही प्रस्तावनेत सांगितली नाही, पण हरकत नाही. खरंतर त्या अनुभवानेच मला खूप काही शिकायला मिळालं. ते आम्ही घेतलेले पहिले प्रशिक्षण
होते. ती "एपीएसआईएस सर्व्ह्यावर फाउंडेशन" (APSIS Survivors Foundation) नावाच्या एका मोठ्या स्वयंसेवी संस्थेसोबत होती. ही एक अशी संस्था आहे जी लैंगिक समस्या, पितृसत्ताक
विचारसरणीच्या किंवा महिलाविरुद्ध लोकांमुळे अॅसिड हल्ल्याला बळी पडलेल्या महिलांना मदत करते. सहसा जेव्हा एखादी स्त्री एखाद्या मुलाशी लग्न करण्यास नकार देते, तेव्हा त्याच्या कुटुंबातील लोक येतात, तिचा सूड घेण्यासाठी तिच्यावर
अॅसिड टाकतात. या सगळ्याबद्दल मला काहीच माहीत नव्हतं. मी त्या स्त्रियांची भीती आणि त्यांच्या
जखमा समजून घ्यायला लागले. बांगलादेशी समाजातील प्रतिगामी तत्वे. त्यांचा सामना करताना मला आनंद झाला.
नंतर, ग्रामीण बँक(Grameen Bank) होती. हे शिरीन अख्तर(Shirin AKHTER) सोबतचे अनुभव होते. नंतर त्या(बांगलादेशी) संसदेच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या(Ministry of Women and Children Affairs) अध्यक्षा झाल्या. त्यावेळी माझ्या आई-वडिलांच्या अवामी लीगशी(Awami League) असलेल्या
संबंधांमुळेच हे शक्य झालं. संसदेचं कामकाज कसं चालतं हे थोडंफार समजल्याने मला खरोखर आनंद झाला. थोडं स्थिर होण्यासाठी हे खूप चांगले अनुभव होते. मला बांगलादेशमध्ये माझी स्वतःची ओळख निर्माण करण्याची गरज होती. म्हणजे, बांगलादेशात अनेक लोक म्हणतात,
"अरे... तुम्ही कुठे गेला होता? तुम्ही हे
कापड कुठे विकत घेतलं? ढाक्यात मला तर ही जागा माहीत नाही!" आणि मला बांगलादेशातील जागा जाणून घ्यायच्या होत्या. मला त्या माझ्या स्वतःच्या वाटायला हव्या होत्या. जसं की सांगायला की मी इथे गेले आणि तिथेपण गेले! त्यामुळे ही कल्पना सुरुवातीपासूनच माझ्या मनात रुळत होती. जरी, माझे पालक थोडे घाबरले होते. काही पालक घाबरू शकतात कारण तुम्ही तुमच्या देशापासून दूर असता. त्यामुळे, सुरक्षेच्या दृष्टीने, तुम्हाला या दुसऱ्या देशाकडून सर्वात वाईट वागणुकीची अपेक्षा असते. बांगलादेश स्वतःहून शोधण्याचा माझा एकमेव मार्ग म्हणजे हे प्रशिक्षण होते.
तिसरी संस्था जिने मला सर्वात जास्त मदत केली, ती म्हणजे "निजेरिया कोरी(Nigera Kori)", ज्याचा अर्थ 'आम्ही स्वतः करतो'. नंतर, माझं जमीनीवरच (fieldwork) काम करण्यासाठी मी या संस्थेसोबत जोडले गेले. ही एक तळागाळातील स्थानिक संस्था आहे जी महिला आणि पुरुषांचे गट तयार करते. ते "भूमिहीन (bhoomihin)" लोकांना, म्हणजे ज्यांच्याकडे जमीन नाही, त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक आणि माहितीपर सत्रांद्वारे स्वतःचं संरक्षण करण्यासाठी एकत्र येण्यास मदत करते. हे बांगलादेशातील अनुभवांबद्दल होतं. मला प्रेरणा देणाऱ्या गोष्टींपैकी एक म्हणजे मला माझ्या अनुभवांमधून स्वतःला वैध(legitimize) आणि स्वतंत्र (emancipate) करायचं होतं.
आता १० वर्षांहून अधिक काळ लोटला आहे की सिओंसपोने(Sciences Po) संपूर्ण फ्रान्समध्ये विद्यापीठ आवार (campuses) तयार करण्यास सुरुवात केली आहे. हे त्यांच्याकडे मोठ्या संख्येने असलेल्या विद्यार्थ्यांना सामावून घेण्यासाठी आहे. हे केवळ पॅरिसमध्येच नाही, तर आपल्या वैशिष्ट्यांच्या क्षेत्रानुसार (area of specialties) बांधले जातात. आशियाई विशेष क्षेत्र ल आव्र मध्ये (Le Havre) आहे.
मी तुम्हाला इथे तात्पुरत्या शिक्षकांबद्दल(temporary teacher) सांगेन. तो एक इंग्रजी शब्द
आहे जो फ्रेंच संदर्भात अचूक नाही. त्याला फ्रेंचमध्ये "वाकातेर (vacataire)" म्हणतात. मुळात फ्रान्समध्ये,
अशी प्रणाली आहे जिथे एकतर तुम्ही प्राध्यापक(professor) असता, जिथे तुम्हाला खूप परीक्षा उत्तीर्ण कराव्या लागतात, अनेक वर्षे काम करावं लागतं. कदाचित मी त्यासाठी पुढे कधी
अर्ज करेन. तिथे तुम्हाला प्राध्यापक म्हणतात. शिवाय, जर तुम्ही "फक्त एक शिक्षक" असाल, तुमच्याकडे हा दर्जा नसेल, तर तो "वाकातेर शिक्षक(enseignant vacataire)" आहे असं मानतात. ही अशी गोष्ट आहे जिच्यावर आज शिक्षकांकडून, आमच्या लोकांकडून खूप टीका केली जाते. कारण विद्यापीठे काय करत आहेत ते असे की ते अधिक "वाकातेर" शिक्षकांना कमी पगार देतात, जरी ते चांगल्या पात्रतेचे असतील तरीही. आम्ही सगळे उच्च शिक्षित आहोत आणि तरीही ते आम्हाला कमी पैसे देतात. त्यामुळे ते या सर्व प्राध्यापकांचा
खर्या अर्थाने योग्य वापर करत नाहीत. अशा प्रकारे, रिक्त जागा कमी असतात. ही परिस्थिती योग्य नाही.
मी सायन्सेस पोमध्ये शिकवत आले आहे, सर्वात आधी "एस्पास मोंदियाल"(Espace
Mondial) नावाच्या वर्गासाठी. तो तिथला खूप प्रसिद्ध वर्ग आहे. आमचं मुख्य व्याख्यान(main lecture) असायचं आणि मग मी छोटे सेमिनार(seminars) देत होते. इथेच मी वर्गाला फ्रेंचमध्ये आणि नंतर इंग्रजीमध्ये शिकवायला सुरुवात केली. ते पहिलं वर्ष होतं. मी इंग्रजीमध्ये त्याआधी खूप गोष्टी केल्या होत्या, पण इंग्रजीमध्ये शिकवणं जरा वेगळच ना? २०१८ मध्ये ही माझी पहिलीच वेळ होती जिथे माझे हे तीन वर्ग होते. तो एक खूप चांगला अनुभव होता. यामुळे, तुम्हाला असं वाटतं की तुम्ही अजून खूप काही करू शकता आणि शिकवू शकता. मी एक वर्ग तयार केला आणि त्याचा प्रस्ताव दिला जो त्यांनी स्वीकारला. त्याचं शीर्षक होतं, "भारत, बांगलादेश आणि पाकिस्तानमधील राज्य, धर्म, समाज आणि हिंसा(State, Religion, Society and violence
in India, Bangladesh and Pakistan)". ते एक छोटेसे सेमिनरी होतं.
अनुबंध: खरंच, तुमची शिकवण्याची आवड केवळ गंभीर समस्या आणि तुमच्या संशोधन कामाच्या विषयांपुरती मर्यादित नाही. तुम्ही INALCO मध्ये बंगालचा इतिहास(history of Bengal) आणि बंगाली कविता(Bengali poetry) सुद्धा शिकवल्या आहेत. तुम्ही आयोजित करत असलेल्या नाट्य महोत्सव "'तोजुर महोत्सव (Toujours Festival)" बद्दल सुद्धा तुम्ही सांगितलं आहे. तुम्ही शास्त्रीय हिंदुस्थानी संगीत शिकला आहात. तुम्ही भरतनाट्यम शिकला आहात आणि तुम्ही ते शिकवता सुद्धा. तुमच्या या अशैक्षणिक (non academic) अनुभवांबद्दल आणि आवडींबद्दल तुम्ही आता थोडक्यात सांगू शकाल का?
शारजा: अर्थातच. धन्यवाद. बंगालच्या इतिहासाबद्दल स्पष्ट करण्यासाठी. ते खरं तर खूप शैक्षणिक (academic)
आहे कारण ते INALCO (Institut National des Langues Orientales) मध्ये आहे. मला बंगालचा इतिहास हा एक वर्ग शिकवण्याची संधी मिळाली. मी इतिहासकार नाही पण तरीही मी यावर शिकवू शकते. दुसरं बंगालीतील वाचनाबद्दल आहे. मला ते खूप आवडलं, कारण इथेच तुम्हाला समजतं की तुम्ही तुमच्या आईसोबत काय शिकत होता. मी अजिबात व्याकरण किंवा भाषा शिक्षिका नाही. पण माझ्याकडे असे विद्यार्थी होते जे आम्ही एकत्र निवडलेले मजकूर वाचत होते. ते करताना मला खूप आनंद झाला.
अधिक कलात्मक गोष्टींसाठी, दोन अनुभव आहेत. पहिला मी भरतनाट्यम बद्दल बोलेन. मी लहानपणापासून भरतनाट्यम करत आहे आणि मला ते खूप आवडले. मला नेहमीच नृत्याची आवड होती. सियोंस पो ही एक असे विद्यापीठ आहे जिथे अनेक संस्था, संघटना(associations, organizations) असतात. कधीकधी ह्या नेहमीच्या वर्गांपेक्षाही जास्त महत्त्वाच्या असतात. माझ्याकडे एक विद्यार्थी होता ज्याचं मला खूप कौतुक वाटलं. त्याने मला सांगितलं की तो भरतनाट्यम शिकत होता. तेव्हा मी स्वतःला म्हणाले, "ते किती मोकळे मनाचे(open minded) आहेत!". दुसऱ्या वर्षात "आतलिये अर्तिस्तिक "(Atelier Artistic), म्हणजे एक कला कार्यशाळा(artistic Workshop) नावाचा
प्रकार असतो. ते संगीत, नृत्य, कला किंवा इतर काहीही असू शकतं. मी ल आव्र येथे सहा वर्षांपासून शिकवत आहे. म्हणून मी त्यांना विचारलं की मी भरतनाट्यमसोबत काहीतरी करू शकते का?
आता शेवटची गोष्ट जी थोडी वेगळी आहे. ती तोजुर महोत्सव(Toujours
festival) बद्दल आहे. माझ्या दोन चांगल्या मित्रांनी या महोत्सवाची स्थापना केली आहे. त्यापैकी एक विनोदकार(comedian) आणि "मेतर ओं सेन (metteur
en scène - दिग्दर्शक)" आहे. त्यांनीच मला
या महोत्सवाकडे आकर्षित केलं. हा महोत्सव एका खूप सुंदर ठिकाणी, "शातो द मोंथो-सें-बेर्नाद (Château de Menthon-Saint-Bernard)" नावाच्या किल्ल्यात (castle) होतो. त्यावेळी त्यांना स्वयंसेवक(volunteers) म्हणून त्यांच्या मित्रांच्या मदतीची गरज होती. मी स्वयंसेवक म्हणून गेले आणि मी तिथे एक दिवस घालवला. खरंतर मला दुसऱ्या दिवशी परत जायचं होतं आणि शेवटी मी पूर्ण आठवडा तिथे राहिले. त्यानंतर
मी त्यांच्या आयोजक समितीत सामील झाले. ही अशी गोष्ट आहे जिने आमच्या राजकीय लढायांना सुद्धा सोबत दिली आणि त्यांना आकार दिला. उदाहरणार्थ, फ्रान्समध्ये गेल्या काही वर्षांपासून त्यांनी या सांस्कृतिक उपक्रमांसाठी वित्त मदतीत भारी कपात केली आहे. त्यामुळे हा महोत्सव आयोजित
करणं हा सुद्धा आमच्यासाठी एक प्रकारचा प्रतिकार आहे.
अनुबंध: खरंच. वित्त
अंदाजपत्रकात कपात(austerity
in budgets) हे खरोखरच आपल्या युगातील एक मोठं आव्हान आहे. आता, तुमच्या अनेक अनुभवांमधील शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही " शारजा (Charza)" हा कपड्यांचा ब्रँड(garment brand) सुरू केला आहे. तुमच्या परवानगीने, मला इंटरनेटवर सापडलेली काही चित्रं इथे मी दाखवू इच्छितो. या अनुभवाबद्दल तुम्ही काही शब्द सांगू शकाल का?
शारजा: हो, "
शारजा" या ब्रँडला माझं नाव आहे. भारतात, बांगलादेशात आपले शिंपी असतात, बरोबर?. फ्रान्समध्ये तसं काही नाही. किंवा जर ते उपलब्ध जरी असतील, तर ते खूप महाग असतात. मी माझ्या मावशीसोबत नेहमी ढाक्याच्या गौसिया बाजारात (Gausia Market) कापड विकत घेण्यासाठी आणि शिंप्यांना नमुना देण्यासाठी जात असे. मी आणि माझी बहीण शाळेत असतांना आम्ही उन्हाळ्यानंतर नेहमी खूप रंगीबेरंगी कपडे घेऊन परत येत असू. त्यामुळे माझ्या अनेक मैत्रिणी त्यावेळी
म्हणायच्या, "मला तुझे पोशाक खूप आवडला!" त्यामुळे शाळेपासूनच हा विचार माझ्या मनात कुठेतरी दडला होता. मी म्हणायची, "एक दिवस, एक दिवस मी माझा एक छोटासा संग्रह (small collection) करेन". त्यामुळे, नंतर हा विचार परत आला. मी स्वतःला म्हणाले,
कदाचित हीच ती वेळ आहे जिथे मी बांगलादेशला परत जाऊन ते करू शकेन. त्यामुळे डिसेंबर २०१६ मध्ये मी माझ्या वडिलांसोबत बांगलादेशला परत गेले. मी ठरवले की मी ५० छोटे पोशाक बनवेन. अशा रीतीने त्याची सुरुवात झाली आणि नंतर ती अशी बनली ज्याला "स्लो फॅशन(slow fashion)" म्हणतात. म्हणजे साधारण २०० कपड्यांपर्यंत. या संग्रहासह मी पॅरिसमध्ये एक छोटा शोरूम(showroom) करू लागले, वर्षातून एक किंवा दोनदा.
अनुबंध: पॅरिसच्या वातावरणात रंगछटा आणि नवचैतन्य रेखाटल्याबद्दल
धन्यवाद!
आता माझ्याकडे तुमच्यासाठी कदाचित एक कठीण प्रश्न आहे. तुम्हाला वाईट वाटणार नाही अशी आशा आहे. जेव्हा कोणी तुमच्या कारकीर्दीकडे आणि तुमच्या आयुष्याच्या प्रवासाकडे बघतो, तेव्हा त्यांना काही खूप प्रसिद्ध संस्थांची नावं दिसतात; संशोधन संस्था आणि शैक्षणिक संस्था जसे की सियोंस पो(Sciences Po), EHESS, सोर्बोन(Sorbonne), ऐन्स्तित्यु मोंतेन (Institut Montaigne). त्यानंतर फ्रेंच परराष्ट्र मंत्रालय(French Ministry of Foreign Affairs), बांगलादेशातील मंत्रालय सुद्धा. अगदी फ्रेंच नागरिकांसाठी सुद्धा, ही खरोखर मोठी नावं आहेत. जी तुमच्या प्रतिभेचा(talent), तुमच्या
उत्कट आवडीचा(passion)
आणि तुमच्या कठोर परिश्रमाचा पुरावा आहेत. परंतु
ही अशी नावं आहेत जी काही विशेषाधिकाराचं(privilege) प्रतीक म्हणून पाहिली जातात. प्रत्येकजण तिथे जाऊन अशा गोष्टींची अपेक्षा करू शकत नाही. या मूल्यांकनावर तुम्ही कशी प्रतिक्रिया द्याल?
शारजा: विशेषाधिकार. मला हे नाकारता येणार नाही की मला असे पालक असण्याचा विशेषाधिकार मिळाला ज्यांच्यासाठी शिक्षण, संस्कृती, भाषा या खूप महत्त्वाच्या आहेत. ही गोष्ट मी नाकारू शकत नाही. तो एक प्रकारचा १००% विशेषाधिकार आहे. पण तुम्हाला हा विशेषाधिकार पुढे घेऊन जायला लागतो. माझे पालक बांगलादेशहून स्थलांतरित (immigrants) असल्याने इथे येण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. त्यांनी बांगलादेशात आपलं सर्वकाही मागे सोडलं. ते आले, त्यांनी इथे आपलं जीवन घडवलं. मी आणि माझ्या बहिणीची पिढी, आम्ही विशेषाधिकारप्राप्त(privileged) आहोत हे खरं आहे. पण, जसे मी तुम्हाला सांगत होते, मी लहान असताना आम्ही नेहमी काम, सराव करत होतो. बाकीच्या
मुलांच्या तुलनेत मी जास्त अभ्यास करत होते. अर्थात जगासाठी जो अर्थ अभिप्रेत आहे तसा संरचनेच्या दृष्टीने आम्हाला नक्कीच
विशेषाधिकार होता. पण नंतर तुम्ही तुमचे विशेषाधिकार कसे वापरता आणि कोणासाठी काम करता यावर ते अवलंबून असतं. या विशेषाधिकाराने मला इतरांप्रती न्याय्य(just) आणि समान(equal) राहण्याचा प्रयत्न करण्यास मदत केली. माझ्या लेखनातून मी वैचारिकदृष्ट्या(ideologically) मूर्खपणे कोणत्याही गोष्टीशी आंधळेपणाने एकनिष्ठ(loyal) न राहण्याचा प्रयत्न करते.
अनुबंध: होय. खरंच, एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे की जेव्हा कोणी तुमच्या कारकीर्दीकडे आणि तुमच्या आतापर्यंतच्या प्रवासाकडे पाहतो, तेव्हा त्यांना असं दिसतं की तुम्ही तुमच्या आवडी-निवडी मनस्वीपणे जोपासल्या आहेत. त्या छंदांचा पाठपुरावा करण्यात तुम्ही स्वतःला मदत केली आहे. म्हणूनच कदाचित तुमची कारकीर्द इतकी सुरेख बहरली आहे असं आम्हाला दिसतं.
आता अगदी शेवटचा मुद्दा आणि मग आपल्याला हा संवादाला आज विराम द्यावा लागेल. तो तुम्ही सुरुवातीला मांडलेल्या स्वतःच्या ओळखीच्या(identity) मुद्द्याबद्दल आहे. अर्थशास्त्रासाठी प्रसिद्ध भारतीय नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन(Amartya SEN) यांचं एक पुस्तक आहे. त्यांच्या "ओळख
आणि हिंसा (Identity
and violence)" या पुस्तकात ते म्हणतात की काहीवेळा तुमची ओळख इतरांद्वारे कशी समजली जाते यावर तुमचं फारच कमी नियंत्रण असतं. ते म्हणतात की ओळख ही तुम्हाला शोध लागणारी गोष्ट नाही, ती तुम्ही सजगतेने
निर्माण करण्याची गोष्ट आहे. यावर तुमची प्रतिक्रिया कशी असेल?
शारजा: त्यांना उद्धृत केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला हे पुस्तक माहीत नाही. पण अमर्त्य सेन यांना बंगाली अस्मिता, साहित्य, संस्कृती ज्या प्रकारे अभिप्रेत आहे त्यावर मी १००% सहमत आहे. सत्यजित रे, अमर्त्य सेन या सगळ्यांसोबत. म्हणजे, जेव्हा मी 'सहमत' आहे असे म्हणते, तेव्हा ती विचारसरणी, ओळख, कला आणि संस्कृती या सगळ्यांच्या सरमिसळीबद्दल
आहे. खरं तर तुमच्याकडे मिश्र संस्कृती नसतानाही, लिंग, वर्ग, कल्पना, राजकारण, आई, वडील, माझा भाऊ, माझं शिक्षण, भाजप, कॉंग्रेस, इत्यादी... तुम्हाला कळतंय ना, मला काय म्हणायचं आहे? तुमच्यात आधीच ह्या ओळखीचे संघर्ष(identity clashes) असतात. तुम्ही जितके मोठे होता तितकी तुमची नेमकी ओळख काय आहे हे समजून येतं. तुमची ओळख सतत बदलत असते. ती
अशी काही निश्चित, न बदलणारी गोष्ट नाही. यामुळेच जीवन खूप आकर्षक आणि रसपूर्ण बनतं. जर ती एक निश्चित गोष्ट असती, तर आपण कधीच इतरांशी संवाद साधला नसता आणि त्यांच्याकडून
काही शिकलो नसतो, बरोबर? होय, ती एक गतिमान गोष्ट आहे आणि ती सदैव विकसित, वृधंगीत होत आहे. मी म्हणेन की ही अशी गोष्ट आहे जी आयुष्याला अधिक संपूर्ण आणि जगण्यासाठी चांगले बनवते.
अनुबंध: धन्यवाद शारजा! हे माझ्यासाठी
एक खूप समर्पक आणि समाधान देणारं संभाषण होतं. मला आशा आहे की प्रेक्षकांना तुम्ही आजवर काय साध्य केलं आहे, काय घडवल आहे याची बर्यापैकी कल्पना आली असेल. पुढील सत्रात आपण ही चर्चा पुढे नेऊया.
शारजा: खूप खूप धन्यवाद!
शारजा शहाबुद्दीन
शारजा शहाबुद्दीन ह्या पॅरिसमधील “इकोल दे ओत एत्युद ओं सियोंस सोसिआल”(École des Hautes Études En Sciences Sociales - EHESS) मधून डॉक्टरेट आहेत. त्या पॅरिसमधील सियोंस पो (Sciences Po) आणि INALCO येथे सुद्धा शिकवतात. त्यांचं संशोधन बांगलादेशातील इस्लामिक नियमांच्या(Islamic norms) निर्मितीवर केंद्रित आहे. त्यांना अनेक भाषा येतात आणि कलांमध्ये त्यांना खूप रस आहे. शारजाने भारतीय शास्त्रीय संगीत(Indian classical music) शिकलं आहे आणि त्या भारतीय शास्त्रीय नृत्य प्रकार, भरतनाट्यम शिकवतात. त्यांचा " शारजा(Charza)" नावाचा कपड्यांचा ब्रँड सुद्धा आहे.
No comments:
Post a Comment