Wednesday, March 23, 2022

हे स्वाभाविक नाही !



माझ्या फ्रान्स आणि फ्रेंच लोक यांच्याशी गेल्या १७ वर्षांच्या मैत्रीतून जर मला केवळ एक प्रतीकात्मक फ्रेंच वाक्य निवडायचे असेल, जे साधारणतः सगळे फ्रेंच लोक वारंवार वापरतात (काही अत्यंत विश्वसनीय सर्वेक्षण सांगतात की हा वापर ते दिवसातून किमान एकदा तरी करतात. ... :), ते असे: 'हे स्वाभाविक (normal) नाही!'… :)

जणू प्रत्येक गोष्टीवर, प्रत्येक विषयावर, फ्रेंच मेंदूला काय स्वाभाविक आहे आणि काय नाही याची पूर्वकल्पना असते! त्यांचा हा  निवाडा, अगदी नैसर्गिक आणि आपसूकपणे होतो. जितका तो तर्कसंगतीने होतो तितकाच सांस्कृतिक सहजतेने. उदाहरणार्थ त्यांचे हे मत एखाद्या वस्तूच्या गुणवत्तेबाबत, कुणा व्यक्तीच्या असभ्य वर्तनाबद्दल, एखाद्या सामाजिक अन्यायाच्या प्रकरणाबाबत, अप्रामाणिकपणाबद्दल इ. असे असू शकते. सर्वसाधारणपणे, ज्यावेळी मुद्दा एखाद्या व्यक्तीच्या किंवा समाजाच्या ठराविक मापदंडांना धक्का पोहोचवणारा असतो तेव्हा आपण म्हणू शकतो: "हे स्वाभाविक नाही"... :) माझ्या मते, जेव्हा कार्यक्षम आणि तर्कसंगत विचार पद्धतीचा मुद्दा असतो तेव्हा एखाद्या व्यक्ती किंवा समाजासाठी अशा प्रकारची उच्चस्तरीय अपेक्षा असणे उत्तमच. मात्र ज्यावेळी अनोळखी किंवा गोंधळात टाकणाऱ्या परिस्थितीशी जुळवून घ्यायचे असेल तेव्हा मात्र हा गुण अडथळा ठरू शकतो.

शिवाय, 'हे स्वाभाविक नाही' या विचारासोबत येणारी अवाजवी खात्री थोडी अडचणीचीच नव्हे का? असो.   माझ्यासारख्या भारतातून येणा-या व्यक्तीसाठी, जिथे काहीही 'स्वाभाविक' नव्हते किंवा अजूनही नाही, अश्या पद्धतीने विचार करण्याची मुभा असणे ही देखील एक प्रकारची चैनच! माझ्यापुरतातरी, या नव्या स्वाभाविकतेचा मी मनमुराद आनंद घेतोय!


3 comments:

  1. मजेदार तरीही विचार करायला लावणारे निरीक्षण. जेव्हा आपण दोन संस्कृतींमध्ये वावरतो आणि आपण जर सजग असलो तर तेव्हा अशी कितीतरी उदाहरणे न्याहाळता येतात जी तेथील रीतीरिवाज, एखाद्या समाजाची विचार करण्याची पद्धत यावर प्रकाश टाकणारी असतात.

    ReplyDelete
    Replies
    1. नक्कीच. नव्या संस्कृती, लोकांशी होणाऱ्या जवळीकीने जगण्याचे, विचार करण्याचे नवंनवे तंत्र आणि मंत्र उलगडतात. आणि यातही काही अगदी सुरवातीला लक्षात येतात तर काही खूप वर्षांनी उमगतात. आणि आश्चर्य म्हणजे, नव्या संस्कृतीशी ओळख आपल्या मूळच्या समाज, संस्कृतीवर ही नव्याने विचार करण्यास प्रेरित करते. तुम्हाला हे निरीक्षण आवडले याचा खूप आनंद!

      Delete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete

Karachi : Désordre ordonné et lutte pour la ville

Ici un entretien captivant avec le professeur Laurent GAYER de SciencePo Paris à propos de son ouvrage phare, «  Karachi : Désordre ordonné...